जनशक्ती (वृत्तसेवा)- शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजवा व डाव्या कालव्यारील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगामासाठी २३ फेब्रुवारीपासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
उन्हाची तीव्रता वाढल्याने लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खालावल्याने शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. यासंदर्भात आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून रब्बी पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. मंत्री विखे पाटील यांनी धरणातील पाण्याचा उपलब्ध साठा तसेच भविष्यातील पाण्याचे नियोजन विचारात घेवून आवर्तनाचा कालावधी निश्चित करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. या आवर्तनाचा उजवा कालव्या वरील राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकर्यांना फायदा होणार असून, सदर आवर्तन ४५ दिवसाचे असेल, त्याच्यासाठी धरणातील ५ टीएमसी इतका पाणीसाठा राखीव आहे. या या आवर्तनाचा लाभ अंदाजित २७हजार हेक्टर क्षेत्राला होईल.


