
अध्यक्षदी साहेबराव कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मच्छिंद्र कदम, माजी पंचायत समिती सदस्य रघुनाथ कुटे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, युवा पत्रकार युन्नुसभाई पठाण, माका सोसायटीचे चेअरमन मल्हारी आखाडे, मराठा उद्योजक समितीचे नगर तालुकाध्यक्ष बालाजी पाटील काळे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख शिवव्याख्याते अशोक पाटील काळे हे लाभले होते.
अशोक कदम, नारायण मुंगसे, चंद्रकांत मुंगसे, लक्ष्मण मुंगसे, सागर वाल्हेकर, विकास आठरे, रविंद्र वांढेकर आदी मान्यवर लाभले होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांनी सर्वांचे स्वागत केले. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आजीनाथ वांढेकर यांनी सत्कार संयोजन केले. मुख्याध्यापिका वनिता चिलका यांनी प्रास्ताविक केले.
मनोगतात शालेय विद्यार्थी, माका चेअरमन मल्हारी आखाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांनी आपले विचार मांडले. प्रमुख वक्ते अशोक पाटील काळे यांनी शिवचरित्राचा सर्वांनी अंगीकार करुन आपले आयुष्य समृद्ध केले पाहिजे. आपले आई वडील,गुरु व देशाचा सदैव मान राखला पाहिजे, असे आपल्या मनोगतात सांगितले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे, महिला भगिनींनी सादर केलेल्या पाळणागीताचे पालकांनी व मान्यवरांनी विशेष कौतुक करुन शाळेच्या गुणवत्तेबद्दल गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाला प्रमुख व्यक्ते अशोक पाटील काळे यांनी शालेय कामकाजावर खुश होवून 5001 रुपये तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील कुटे यांनीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त 2100 रुपये जाहीर केले.पालकांनी रोख 7800 रुपये, वस्तुरुपाने 1600 असे एकूण 16500 रुपये देणगी जमा झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी केले. यावेळी मच्छिंद्र कदम, रघुनाथ कुटे, चंद्रभान कदम, मोहन ताके, हरी मुंगसे, भानुदास कुटे, मधुकर वांढेकर, आजीनाथ वांढेकर, दत्तात्रय कदम, गवजी नजन, राजु पवार, राम पवार, नितीन कदम, महेश घोडके, विष्णू म्हस्के, सर्जेराव पाटील मुंगसे, प्रदिप कदम, सिंधुबाई कदम,
मदलासाबाई कदम, लताबाई ताके, जिजाबाई मुंगसे, जिजाबाई कदम, सुबाबाई कदम, मंगल मुंगसे, आशाबाई मुंगसे, अलका कदम, अंगणवाडी सेविका रुक्मिणी तांबे, मदतनीस राधिका मुंगसे, सुनिता कदम, कविता कदम, वैशाली कदम, अनिता शेटे, प्रतिक्षा कदम, अर्चना वांढेकर, पल्लवी कदम, मयुरी कदम, रुपाली म्हस्के, सुनंदा वाल्हेकर, पूजा म्हस्के, अलका मुंगसे, प्रतिक्षा कदम,उषा ताके,सुरेखा पवार,लिलाबाई पवार,हौसाबाई ताके,योगिता मुंगसे,रोहिणी कदम,पूजा मुंगसे,प्रियंका मुंगसे आदी पालक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेला गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर,केंद्रप्रमुख कमल लाटे,केंद्र मुख्याध्यापक सतिशकुमार भोसले यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.या कार्यक्रमाचे बालाजी देडगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.


