जेऊर हैबती येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. १२ एप्रिल ते शनिवार दि. १९ एप्रिल २०२५ या कालावधीत पावन हनुमान मंदिर देवस्थान येथे करण्यात आले आहे. वै. हभप शिवराम महाराज रिंधे, वै. हभप गुरुवर्य बन्सी महाराज तांबे (श्री क्षेत्र नेवासा), वै. यादव महाराज म्हस्के, वै. हभप रामभाऊ महाराज रिंधे यांच्या कृपाशीर्वादाने व समस्थ ग्रामस्थ व भजनी मंडळ यांच्या सहकार्याने हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे. उद्या शनिवारी (दि.१२) सकाळी ८.३० वाजता महंत हभप गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, महंत हभप गुरुवर्य स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज, वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के (नेवासा) यांच्या शुभहस्ते कलश पूजन, विणा पूजन व ध्वज पूजन होणार आहे. व्यासपीठ चालक म्हणून रावसाहेब महाराज खराडे, हभप देविदास महाराज म्हस्के, हभप महेश महाराज रिंधे हे असतील. या सप्ताहकाळात पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ विष्णू सहस्रनाम, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ४ ते ६ हरिपाठ सायंकाळी ६ ते ८ भोजन, रात्री ८ ते १० हरिकीर्तन व हरिजागर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सप्ताह काळामध्ये शनिवारी (दि.१२) हभप संजय महाराज बिलवाल (शेवगाव), रविवारी (दि.१३) हभप अतुल महाराज आदमाने (निपाणी निमगाव), सोमवारी (ता.१४) हभप कृष्णाजी महाराज ताठे (चितळी), मंगळवारी (ता.१५) हभप तुकाराम महाराज केसभट (वाघोली), बुधवारी (ता.१६) हभप उद्धव महाराज सबलस (शेवगाव वडूले), गुरुवारी (ता.१७) हभप योगीराज महाराज पवार शास्त्री (भागवताचार्य, अमळनेर), शुक्रवारी (ता.१८) हभप महंत स्वामी श्री प्रकाशनंदगिरीजी महाराज (उत्तराधिकारी, श्रीक्षेत्र देवगड संस्थान) यांची किर्तनसेवा होणार आहे. तर शनिवारी (ता.१९) हभप महंत वेदांतचार्य देविदासजी महाराज म्हस्के (नेवासा) यांचे सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत अमृततुल्य काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल. तरी जेऊर हैबती व परिसरातील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ जेऊर हैबती यांनी केले आहे.