जेऊर हैबती येथील पारायण सोहळ्यात आज प्रकाशनंदगिरीजी महाराजांची किर्तनसेवा

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आज शुक्रवारी (ता.१८) हभप महंत स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड संस्थान) यांची किर्तनसेवा रात्री ७ ते ९ या वेळेत होणार आहे. काल गुरुवारी (ता.१७) हभप योगिराज महाराज पवार शास्त्री (भागवताचार्य अमळनेर) यांच्या कीर्तनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब तांबे,सोपान गुंजाळ (सेक्रेटरी),भाऊसाहेब मिसाळ (क्लार्क), सर्जेराव ताके,काटे भाऊसाहेब (ग्रामविकास अधिकारी), गवारे दिपक,शरद सरोदे, रिंधे शरद, शिवाजी मिसाळ, प्रशांत विठ्ठलराव ढोकणे पाटील, ओमकार महेशराजे म्हस्के, पांडुरंग पाटील देशमुख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
पावन हनुमान जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात व्यासपीठ चालक
हभप राऊसाहेब बाबा खराडे, हभप देविदास महाराज म्हस्के, हभप महेश महाराज रिंधे, बाळासाहेब रिंधे (मा.सरपंच), गणपत मामा तांबे, दिगंबर मामा शिंदे, कारभारी बाबा खराडे,एकनाथ खराडे, बाळासाहेब उगले,
कचरु जावळे, अशोक कन्हेरकर, अंबादास काकडे, राधाकिसन घुगरे (सर), बाळासाहेब कपिले, बबनराव तांबे, आर्यन गहाळ, वैभव गवारे, नंदकुमार काका उगले
सिध्दार्थ म्हस्के, कृष्णा कारभारी म्हस्के, नारायण नेवृत्ती म्हस्के (पिट्टू), ताके किरण गोरक्षनाथ, कर्डिले चंद्रशेखर गोरक्षनाथ, उगले अर्पित देविदास, आचपळ भाऊ जवादे हे वाचक पारायणासाठी सेवा देत आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहकाळात किर्तन स्रवनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ जेऊर हैबती यांनी केले आहे.