देडगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मानवंदना देण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने गाव दुमदुमून गेले होते. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे अध्यक्षस्थानी होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी केले. तर आरपीआयचे नेते अशोकराव गायकवाड, सरपंच चंद्रकांत मुंगसे, युवा नेते निलेश कोकरे, बाल वक्ता हर्षवर्धन ससाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करत बाबासाहेबांचे विचार मांडले.
या कार्यक्रमासाठी पारंपारिक पद्धतीने नामांकित सरस्वती बँडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शांततेत गावात फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मिरवणूक पार पडली. यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होत बाबासाहेबांचा जयजयकार करत होते. या सोहळ्यासाठी माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, अशोकराव मुंगसे वायरमन, एकलव्य संघटनेचे शिवाजी थोरात ,वंचित बहुजन आघाडीचे बलभीम सकट, एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद थोरात, पास्टर एलिया हिवाळे, युवा नेते श्रीकांत हिवाळे ,भाजपचे आकाश चेडे, माजी चेअरमन अरुण बनसोडे, नितीन हिवाळे ,फकीरचंद हिवाळे, अशोकराव जावळे ,सचिन हिवाळे, आशिष हिवाळे, आप्पा दळवी, ग्रामपंचायत सदस्य आनंद दळवी, सागर मिरपगार, अन्वर सय्यद, प्रशांत ससाणे, भावड्या ससाणे, शिवाजी ससाणे, राकेश दळवी, संपत ससाणे, संजय हिवाळे, पै. रंगनाथ कोकरे, सामाजिक न्याय विभागाचे अभिजीत ससाणे, अक्षय ससाणे, अजय ससाणे, राहुल ससाणे, विशाल ससाणे, वसंत ससाणे, सुनील ससाणे, विलास ससाणे, प्रदिप ससाणे, बंडू शिरसाट, बाबू अंकल हिवाळे आदी भीमशक्ती उत्सव समिती व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीकांत हिवाळे यांनी आभार मानले.