शहापूर येथे कालभैरवनाथ यात्रा उत्सवाचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील शहापूर येथे आजपासून श्री कालभैरवनाथ यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ८ ते ९ कावडी मिरवणूक, सकाळी ९ ते १० श्री भैरवनाथ मूर्तीस गंगाजल स्नान, आरती व प्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री सात ते आठ शोभेची दारू व छबीना मिरवणूक होणार आहे. त्यानंतर रात्री ८ ते १२ विलास देवठाणकर सह शिवकन्या पुणेकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सोमवारी (ता.२१) सकाळी ८.३०ते १० हजेरीचा कार्यक्रम, सायंकाळी ५ ते ६ कुस्त्याचा जंगी हंगामा व रात्री ८ ते ११ राष्ट्रीय भारुड सम्राट हभप हमीद महाराज सय्यद यांचा एकनाथी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. तरी परिसरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी विनंती समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ, शहापूर यांनी केली आहे.