बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित एक सक्षम, उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण आधुनिक शिक्षण प्रणाली म्हणून अल्पावधीतच नावाजलेल्या चाइल्ड करिअर ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत यावर्षीही बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला.
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च 24-25 रोजी बारावीच्या परीक्षा झाल्या. नुकताच H.S.C परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये चाईल्ड करिअर जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून ज्युनिअर कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. या परीक्षेमध्ये एकूण 56 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते . विशेष बाब म्हणजे एकूण सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले. यामध्ये आरसुळे पायल शरद या विद्यार्थिनीने 79.50% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. फुलारी ईश्वरी बाळासाहेब या विद्यार्थिनीने 76.83% गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला तर खाटीक साक्षी आबासाहेब हिने 75.83% गुण मिळवत तृतीय तर नजन सिद्धी अण्णासाहेब हिने 74.67% गुण मिळवत चतुर्थ तर मापारी कल्याणी प्रसाद हिने 73.00% गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक प्रा. सागर बनसोडे सर, कॉलेजचे प्राचार्य रवींद्र गावडे सर, संस्थेचे विश्वस्त अंबादास गोरे, मनोहर बनसोडे, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.