तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मन्वंतर शिक्षण संस्थेच्या तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचा यावर्षीचा इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

विद्यालयात मुंगसे सुप्रिया विजय हिने ८०.८० % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कदम प्रज्ञा आत्माराम (७८.६०%), तृतीय क्रमांक खरात धनश्री रामदास (७७.४०%) तर चतुर्थ क्रमांक कदम सार्थक नामदेव (७६.४०%) यांना प्राप्त झाला. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विजय कदम, संचालिका शुभांगी विजय कदम, प्राचार्य विठ्ठल भाऊसाहेब कदम तसेच उपप्राचार्य संदीप आप्पासाहेब खाटीक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांचेही विशेष कौतुक केले. शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवत तक्षशिला शाळेने शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमठवला आहे. या यशाकरता विद्यार्थ्यांना अशोक पवार, गणेश नांगरे, मनीषा अवताडे, मयुरी पवार, पुनम चिमखडे, मोहिनी कर्डिले, कल्पना पवार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.