मुनोत परिवाराची देडगाव येथील महादेव मंदिरास सदिच्छा भेट 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील महादेव मंदिरास पुण्यातील उद्योजक जितेंद्रजी मुनोत यांचे वडील प्रेमराज मुनोत, माताजी श्यामाजी मुनोत यांसह मुनोत परिवाराने देडगाव येथील महादेव मंदिरात सदिच्छा भेट दिली. यावेळी मुनोत परिवाराच्या वतीने महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला.यावेळी महादेव मंदिरात कैलासनाथ मित्र मंडळाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने मुनोत परिवाराचा भव्य असा सत्कार करण्यात आला. मुनोत यांचे जावई श्री ललितजी गांधी व मुलगी सुहासिनीताई गांधी यांच्या संकल्पनेतून शांती क्षमा प्रेम सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली असून यापुढेही भरभरून सहकार्य करण्याचे आश्वासन श्यामाजी मुनोत यांनी व्यक्त केले. यावेळी कैलासनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कदम, अरुण वांढेकर, विठ्ठल क्षिरसागर, हरिभाऊ देशमुख, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, सतीश मुथ्था, अशोक चेडे, मधुकर क्षीरसागर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.