बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र शासनाने इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करावयाचे ठरवले आहे. हे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? विद्यालयाचा प्राधान्यक्रम कसा निवडावा? त्यासाठी कोणती कागदपत्रे जोडावीत? फॉर्मचे शुल्क किती भरावे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहेत. या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी तक्षशिला ज्युनिअर कॉलेजमध्ये ऑनलाइन मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांनी तक्षशिला ज्युनिअर कॉलेजमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य विठ्ठल कदम व उपप्राचार्य संदीप खाटीक यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांनी सोबत येताना इयत्ता दहावीचा शाळा सोडलेला दाखला, दहावीचे मार्कशीट, आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन यावीत. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत व मार्गदर्शन केले जाईल. तक्षशिला ज्युनिअर कॉलेजमध्ये मेडिकलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्रॉप सायन्स हा २०० मार्कांचा विशेष विषय असून इंजिनिअरींगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आय टी) हा विषय उपलब्ध आहे. तरी या सर्व सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शाळा व्यवस्थापनाने केले आहे.
