उर्जामंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडून मुंगसे कुटुंबियांचे सांत्वन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील विशाल कुंडलिक मुंगसे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुंगसे कुटुंबियांसह बालाजी देडगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र राज्याच्या उर्जामंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी मुंगसे कुटुंबीयांची घेत त्यांचे सांत्वन केले.
यावेळी मेघनाताई बोर्डीकर यांनी या दुःखातून सावरण्यासाठी मुंगसे कुटुंबियांना धीर दिला. यावेळी बालाजी देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, माजी चेअरमन भानुदास मुंगसे, लताबाई मुंगसे, भावना मुंगसे, मोनाली मुंगसे, स्वाती आरगडे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, पोपट मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, आएएस अधिकारी सचिन मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, अशोक मुंगसे, अरुण वांढेकर, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, महादेव मुंगसे, पत्रकार इंनुस पठाण आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.