देडगाव येथे कृषिदूत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथे कृषी महाविद्यालय भानसहिवरेच्या कृषिदूतांचे आगमन झाले आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ते गावात वास्तव्यास राहून शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक मार्गदर्शन करणार आहेत. या कृषिदूतांचे देडगाव येथे ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या गटाचे मार्गदर्शक डॉ. प्रकाश तुरभटमट सर व प्रा. मनोज माने सर असून या गटांमध्ये कृषिदूत धनंजय आव्हाड, कुणाल उंडे, विशाल गागरे अनिकेत धानापुणे, काळे प्रशांत, विशाल आव्हाड हे विद्यार्थी आहेत. हे कृषिदूत शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती, सुधारित शेती पद्धती, पिकांचे नियोजन, खत व्यवस्थापन, जैविक शेती, सिंचन पद्धती आणि विविध सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याचे कार्य करण्यात येणार आहे. या कृषिदूतांचे देडगाव येथे ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे, शुभम कुटे, शुभम पळसकर, सचिन बनसोडे आदी शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावातील शेतीत नक्कीच सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.