बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील बालाजी मंदिर येथे दिव्य ज्योती जाग्रती संस्थान शाखा पाथर्डीच्या वतीने २ जून ते ४ जून या तीन दिवसीय शिव आराधन आध्यात्मिक प्रवचन व भजन सकीर्तन कार्यक्रमाच्या त्रितीय दिनीचे दीप प्रज्वलन ह.भ.प. सोमेश्वर महाराज गवळी (वैष्णव आश्रम ब-हाणपूर) ,श्री.सुभाषशेठ चोपडा (बालाजी देवस्थान देडगाव ट्रस्टचे उपाध्यक्ष) ,ह.भ.प.बंडू वांढेकर, ह.भ.प.सदाशिव महाराज पुंड,श्री बाजीराव पा.मुंगसे,श्री कारभारी पा.चेडे, श्री.अजितदादा मुरकुटे, श्री जनार्दन मुंगसे यांच्या शुभहस्ते झाले. सद्गुरु सर्वश्री आशुतोष महाराजजी यांचे शिष्य स्वामी अमोघानंदजी यांच्या वाणीतून गुरु गीता,गाथा,ज्ञानेश्वरी व संत एकनाथ महाराज यांच्या अभंगाच्या आधारावर भगवान शिवजींचे दर्शन याच देहात करता येते. त्यासाठी वेळेचा पूर्ण सद्गुरू जीवनात आवश्यक आहे. गुरु गीतेमध्ये भगवान शिवजी माता पार्वतीला सांगतात की गुरु सात प्रकारचे असतात. आत्म अनुभव करून देणारा म्हणजे शीव तत्वचे दर्शन करून देणारा गुरु हा सातव्या क्रमांकाचा परम गुरु असतो आणि त्यांनंतर शाश्वत ध्यानाची विधी प्राप्त होते आणि त्याचं ध्यान साधनेच्या माध्यमाने सर्व संत महापुरुषांनी अध्यात्माच्या परम शांतीला प्राप्त केले.
या सोबतच अनेक सामाजिक विषयांवर समाधानकारक आत्मचिंतन स्वामीजींनी मांडले. या आत्मचिंतनाचा लाभ देडगाव व पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी घेतला. कार्यक्रमाची सांगता शीवजींच्या मंगलमय आरतीने झाली त्यांनंतर आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बालाजी देवस्थान ट्रस्ट देडगावचे अध्यक्ष श्री नवनाथ पा.मुंगसे ,बालाजी देवस्थान ट्रस्टचे सर्व संचालक ,माउली उद्योग समूह खोसपुरीचे भिसे बंधू ,बालाजी यात्रा कंपनी , बालाजी बचत गट, बालाजी केटरर्स, बालाजी रिवाइंडिंग वर्क्स देडगाव तसेच देडगावातील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
