छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक सोहळा उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. या दुग्धाभिषेक सोहळ्याचा मान बालाजी देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे यांना देण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून हभप सुखदेव महाराज मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, राजुदेवा तांदळे, राजेंद्र देशमुख, अरुण वांढेकर पत्रकार इन्नुस पठाण, संजय मुंगसे, श्रीमंत पुंड, रघुनाथ कुटे महादेव पुंड, अशोक मुंगसे, नारायण बनसोडे, बन्सी पाटील मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.