बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतमार्फत विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिर व हिमोग्लोबिन तपासणी, गर्भवती मातांची मोफत आरोग्य तपासणी, बालकांचे मोफत लसीकरण, ग्रामस्वच्छतेसाठी श्रमदान करणे, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत विविध दाखले वाटप करणे,
दिव्यांगांना वैश्विक कार्ड वाटप करणे, ५०% कर सवलतीचा लाभ देणे या विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी चेअरमन कडूभाऊ तांबे होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सरपंच चंद्रकांत मुंगसे, गटविकास अधिकारी संजय लखवाल उपस्थित होते.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कानडे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, शाखा अभियंता पंचायत समिती नेवासा महाडुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांनी केले. यावेळी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे, अहिल्याबाई होळकर विद्यालयाचे प्राचार्य स्वरुपचंद गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, जालिंदर खांडे,
आनंद दळवी, अंबादास तांबे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अभिजीत ससाणे, कल्पना हिवाळे, ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब म्हस्के, गणेश तांबे, संजय कुटे, सर्व बचत गटातील महिला, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अजित गवळी, डॉक्टर सूर्यवंशी, दाभाडे,
आशा सेविका, आरोग्य पर्यवेक्षक पाचरणे, आरोग्य निरीक्षक पालवे, लॅब टेक्निशियन तागड मॅडम, पाटील, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार इंनुस पठाण यांनी केले. तर ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



