तेलकुडगाव येथील प्रगतशील शेतकरी किशोर घोडेचोर यांचा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- तेलकुडगाव येथील प्रगतशील शेतकरी किशोर घोडेचोर यांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चालू असलेल्या अनेक प्रभावी योजना, त्यामध्ये पाच लाख रुपयाचे सोलर तीस हजार रुपयेमध्ये शेतकऱ्यांना मिळत आहेत,  माझ्या स्वतःच्या शेतात दोन मोटरी आहेत परंतु एक रुपयाही लाईटचे बिल मला येत नाही, २०२१-२२ ला टेबल लावून दर तीन महिन्याला प्रत्येक मोटरी मागे पाच-पाच हजार रुपये भरावे लागत होते, केंद्र सरकारच्या प्रभावी धोरणामुळे एफआरपी मुळे आज माझ्या ऊसाला तीन हजार रुपये भाव मिळत आहे.
बळीराजा शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारच्या भरीव योजना व देव देश आणि धर्म यांसाठी सक्षमपणे काम करणार्या सरकारच्या अशा अनेक निर्णयामुळे प्रभावित होऊन मी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला, असल्याचे घोडेचोर यांनी सांगितले. या प्रवेशावेळी शिवसैनिक भाऊसाहेब मामा वाघ, अंकुशराव काळे, प्रताप चिंधे, संजय घोडेचोर, सरपंच सतिशराव काळे, दत्तुराजे काळे, सोपानराव शेंडगे, रंगनाथ डूकरे, पप्पू चेमटे आदी उपस्थित होते.