बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेचा यंदाचा निकाल ८१.८१ % लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. योगिता पाराजी पुंड हिने ९४.६०% मार्क्स मिळून प्रथम क्रमांक मिळवला. तर मुळा एज्युकेशन संस्थेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. तर अमृता भाऊसाहेब बनसोडे हिने ८३% मार्क्स मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर श्रध्दा निवृत्ती तांबे हिने ७७.२०% मार्क्स मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. याबद्दल या गुणवंत मुलींचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. तर ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार युनूस पठाण व नम्रता हंडाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत मुलींचे अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, माजी उपसभापती कारभारी चेडे , माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन जनार्धन देशमुख, बालाजी देवस्थानचे विश्वस्त रामभाऊ कुटे, ग्रामपंचायत सदस्य पोपटराव मुंगसे ,कानिफनाथ गोयकर, व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे, आदिनाथ पुंड, रामभाऊ काजळे, मुरलीधर मुंगसे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरे सर यांनी केले तर आभार शाळेचे पर्यवेक्षक ज्ञानदेव कदम सर यांनी मानले.
