पंतप्रधान मोदी यांच्याकडून भारतीय अर्थव्यवस्थेचा गौरव; लाल किल्ला येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात

जनशक्ती (वृत्तसेवा)- भारताने आज एक मोठं स्वप्न पाहिलं आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा 2047 साली आपण विकसित भारताचे ध्येय पूर्ण करुन राहू. 140 कोटी जनतेच्या पुरुषार्थाने आपल्या हे ध्येय साध्य करायचे आहे, असा निर्धार पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ते शनिवारी भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन ते बोलत होते. यावेळी […]

सविस्तर वाचा

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास; पहिल्यांदाच गायलं जाणार पूर्ण ‘वंदे मातरम’!

जनशक्ती (वृत्तसेवा)- उद्या (ता. १५) लाल किल्ल्यावर साजरा होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात पहिल्यांदाच ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गायले जाईल, अशी माहिती संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वर्षीचा सोहळा ‘वंदे मातरम’ गीताची १५० वर्षे आणि २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनवण्याच्या उद्दिष्टात तरुण भारतीयांचं योगदान यावर केंद्रित असेल.८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला सुमारे २७ हजार लोक […]

सविस्तर वाचा

कामगार कायद्यांविरोधात देशभरातील दहा कामगार संघटनांची उद्या भारत बंदची हाक

जनशक्ती (वृत्तसेवा)- केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल केले आहेत. या कामगार कायद्यांविरोधात देशभरातील दहा कामगार संघटनांनी उद्या भारत बंदची हाक दिली आहे. यात काय चालू आणि काय बंद ते जाणून घेऊयात.केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलाला देशभरातून तीव्र विरोध केला जात आहे. या कामगार कायद्यांविरोधात देशभरातील दहा कामगार संघटनांनी उद्या गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 […]

सविस्तर वाचा

‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान सिकंदर शेखला अटक; कुस्ती क्षेत्रात खळबळ

जनशक्ती (वृत्तसेवा)- आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्र हादरले आहे. सिकंदरचा सहभाग आंतरराज्यीय शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीत असल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कुस्ती […]

सविस्तर वाचा

भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय; श्रेयस, गिल, अक्षर चमकले

जनशक्ती (वृत्तसेवा)- भारत व इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने सुमारे 12 षटके व चार गडी राखून इंग्लंडला चितपट केले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना नागपूरमध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. […]

सविस्तर वाचा

खुशखबर! सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, करदात्यांचं आठ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता 

जनशक्ती (वृत्तसेवा)- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आर्थिक पाहणी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल मांडणार आहेत. उद्या निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे.  केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला […]

सविस्तर वाचा

भारताचा विजयी ‘तिलक’; रोमहर्षक सामन्यात मारली बाजी

जनशक्ती (वृत्तसेवा)- भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका चालू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज चेन्नईतील चेपॉक मैदानावर खेळवण्यात आला. या दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडवर निसटता विजय मिळवला. भारताला 13 चेंडूंमध्ये 13 धावा काढायच्या होत्या. तिलक वर्माच्या जोरदार फलंदाजीमुळे भारताला इंग्लंडने उभारलेली धावसंख्या गाठता आली. सामन्याच्या सुरुवातीला सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी […]

सविस्तर वाचा

आजपासून नियमात बदल, खिशाला लागणार कात्री?

जनशक्ती ( वृत्तसेवा)- साल २०२४ संपले आहे. नवीन वर्षाच्या १ तारखेपासूनच अनेक दैनंदिन कामकाजाच्या गोष्टीचे नियम बदलले आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील होणार आहे. हे बदल १ जानेवारीपासून लागू होत आहेत, त्यामुळे कोणते बदल होत आहेत आणि त्याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे ते पाहूयात… एक जानेवारीपासून नवीन वर्षे सुरु झाले आहे. […]

सविस्तर वाचा

भारतीय क्रिकेट संघाचा दारुण पराभव; फलंदाजांची सपशेल शरणागती 

जनशक्ती (वृत्तसेवा)- ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आघाडीच्या फलंदाजांच्या निष्क्रिय फलंदाजीचा फटका टीम इंडियाला बसला. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर टीम इंडियाच्या वाटेला गोलंदाजी आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 474 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव गडगडला. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने पहिल्या डावात चांगली झुंज दिली. शतकी खेळी करत भारतावरील फॉलोऑनचं संकट […]

सविस्तर वाचा

नितीशकुमार रेड्डी ऑस्ट्रेलियाला नडला; ठोकले दणदणीत शतक

जनशक्ती (वृत्तसेवा)- मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. विशेषत: नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हा दिवस गाजवला. तिसऱ्या दिवशी या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेट्ससाठी अक्षरशः रडवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 358/9 धावा केल्या होत्या. नितीश रेड्डी आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले […]

सविस्तर वाचा