बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील प्रसिध्द अशा महादेव मंदिर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त क्षिरसागर परिवाराच्या वतीने महाअभिषेक व आरती करण्यात आली. तसेच यावेळी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या काळामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे पारायणही करण्यात आले. येथील महादेव मंदिर येथे कैलासनाथ मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्षिरसागर परिवाराचे जावई शुभम अमोल महामुनी व कन्या वैष्णवी शुभम महामुनी या दाम्पत्याच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.
यावेळी विठ्ठल विष्णुपंत शिरसागर, संदेश मधुकर शिरसागर, मधुकर विष्णुपंत क्षीरसागर,
माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, राजू कदम, उद्धव नांगरे, हरिभाऊ मुंगसे, प्रकाश कोलते, हरी जाधव, विजय गोयकर, बाळासाहेब मुंगसे, अरुण वांढेकर यांनी यावेळी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी महामुनी दांपत्याचा कैलासनाथ मित्र मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी क्षिरसागर परिवाराच्या वतीने उपस्थित भाविकांना खिचडी वाटप करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी आरती व प्रसादाचा लाभ घेतला.