अहिल्याबाई होळकर विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनवले मातीचे पर्यावरण पूरक गणपती

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मुळा एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,देडगाव येथील विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या अंगी असणाऱ्या कौशल्याचा विकास व्हावा याच हेतूने पर्यावरण पूरक नैसर्गिक माती पासून गणेश गणपती बनवण्याची कार्यशाळा संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून नुकतीच पार पडली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आकर्षक व सुबक गणपती मूर्ती बनवल्या या कार्यशाळेत विद्यालयाचे कला अध्यापक संजय पुंड,प्रकाश मचे यांनी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले विद्यालयातील 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला होता वबआपल्या कल्पकतेने अतिशय सुंदर गणेश मूर्ती तयार केल्या गणेश मूर्ती बनवण्यात विद्यार्थी अतिशय तल्लीन झालेले दिसून आले यावेळी प्राचार्य एस के गायकवाड यांनी मुलांना या तयार केलेल्या मूर्ती घरी गणेश उत्सव मध्ये बसवण्याचे आवाहन केले या कार्यशाळेसाठी विद्यालयाचे प्राचार्य एस.के.गायकवाड पर्यवेक्षक रावसाहेब राशिनकर व सर्व शिक्षक उपस्थित होते.