पावन महागणपती देवस्थानच्या उत्सवाला आजपासून सुरुवात

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरे व परिसरातील पावन महागणपती देवस्थानच्या उत्सवास सालाबादप्रमाणे उत्साहात सुरुवात करण्यात आली.
मागील 27 वर्षापासून गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, सुनीलगिरीजी महाराज, गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने व ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, ह भ प सदाशिव महाराज पुंड यांच्या अधिपत्याखाली करण्यात आले आहे. हा उत्साह बुधवार 27 रोजी पासून सुरुवात होत असून शनिवार दिनांक 6 रोजी पर्यंत चालणार आहे. या उत्सवामध्ये दररोज अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तर भजन, कीर्तन, जागर अशी विविध धार्मिक कार्यक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये मंगळवार दिनांक 2 रोजी ह भ प महेश महाराज रिंधे यांची कीर्तन रुपी सेवा सायंकाळी 5 ते 6 वेळेत होणार आहे. व बुधवार दिनांक 3 रोजी ह भ प प्रदीप महाराज वाघमोडे यांची सायंकाळी पाच ते सहा वेळेत कीर्तन रुपी सेवा पार पडणार आहे. तर शनिवार दिनांक 6 रोजी काल्याचे किर्तन ह भ प भागवताचार्य बाबासाहेब महाराज मतकर यांचे होणार आहे. अशा विविध कार्यक्रमाने हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हा उत्साह सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान भक्त सेवा मंडळ व बालाजी भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ देडगाव, पाचुंदा, माका, म.ल. हिवरे येथील भाविक परिश्रम घेत आहेत. या सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.