बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२४ मधून Inspecting Officer (Supply Department) राजपत्रित अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल तुषार अण्णासाहेब वाघमारे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार दिनांक १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता निंबेनांदूर जानापूर पाचुंदा रोड येथील श्री संत सेना महाराज मंदिर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्री संत सेना महाराज संस्थान श्रीक्षेत्र नेवासा येथील हभप सचिन महाराज पवार यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन निंबेनांदूर, पाचुंदा, माका, सेवा सहकारी सोसायटी व मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे. तरी या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


