जिल्हास्तरीय गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद हत्राळ सैदापूर शाळेचा डंका

आपला जिल्हा

​पाथर्डी (प्रतिनिधी) )- जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हत्राळ सैदापूरच्या विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. रेसिडेन्शिअल (residential) हायस्कूल येथे ३१ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

​विजेते स्पर्धक व यश:
​या स्पर्धेत वेशभूषेनुसार सादरीकरण महत्त्वाच्या प्रकारात शाळेने बाजी मारली आहे.
​वेशभूषा सादरीकरण (कुमार गट): इयत्ता ७ वी मधील साक्षी महादेव केदार हिने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला.
​कौतुकाचा वर्षाव:
​विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक उल्हास बटूले, प्रतिभा खेडकर मॅडम, अभिमान पाखरे सर, आजिनाथ भडके सर पदवीधर शिक्षक शैलेश खनकर सर, एकनाथ गायकवाड सर यांचे मार्गदर्शन लाभले. हत्राळ – सैदापूर गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य,तसेच पालकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळाल्यास ती मुले कोणत्याही स्तरावर चमकू शकतात, हे या विद्यार्थिनींनी सिद्ध केले आहे.