बालाजी देडगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहास धर्म ध्वजारोहणाने प्रारंभ  

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- बालाजी देडगाव येथे महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची धर्म ध्वजारोहणाने उत्साहात प्रारंभ करण्यात आला. येथील महादेव मंदिर देवस्थान येथे आयोजित या सोहळ्यात हभप देविदासजी महाराज म्हस्के (संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासा) यांच्या शुभहस्ते, मेजर रवींद्र देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्म ध्वजारोहण पार पडले. यावेळी सपना वेलनेस परिवाराचे डॉ. अर्जून सुसे,  हभप सदाशिव महाराज पुंड, हभप बाबासाहेब महाराज वांढेकर, माजी सभापती कारभारी चेडे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, मार्केट कमिटीचे माजी सभापती कडूभाऊ तांबे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, माजी चेअरमन कारभारी मुंगसे, भाऊसाहेब मुंगसे, मच्छिंद्र मुंगसे, कुंडलिक दादा कदम, रघुनाथ कुटे, मधुदेवा तांदळे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, सतीश मुथ्था, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुनील मुथ्था,

मधुकर क्षीरसागर, मच्छिंद्र कदम, भाऊसाहेब सावंत सर, बहिरवनाथ एडके, विवेक औटी, दादासाहेब वाहूरवाघ, जनाभाऊ मुंगसे, भाजपचे आकाश चेडे, बाळूशेठ चोपडा, संदीप तांबे आदी उपस्थित होते. संदीप नांगरे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कैलासनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कदम, हरिभाऊ देशमुख, अरुण वांढेकर, विठ्ठल क्षीरसागर, समस्त ग्रासस्थ व भजनी मंडळ देडगाव विशेष परिश्रम घेत आहेत.