बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता,संस्कार व व संस्कृती जपणारी शाळा म्हणून नावाजलेली व तसेच आय.एस.ओ मानांकन प्राप्त तालुक्यातील एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा असलेली चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुदर्शन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय कोळेकर सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मचारी ज्ञानेश्वर महाराज व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे सर हे होते.
आयुष्यात मोठी ध्येय ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा .असे प्रतिपादन दत्तात्रय कोळेकर सर यांनी केले. आज तुम्ही जिथे आहात तिथे पोहोचविण्यात तुमचे आई वडील आणि शिक्षकांचा मोठा वाटा आहे. त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहीलच. असे प्रतिपादन ब्रह्मचारी ज्ञानेश्वर महाराज यांनी केले. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त कष्ट आणि नियोजन हे गरजेचे असते असे प्रतिपादन प्राचार्य श्री रवींद्र गावडे सर यांनी केले. आयुष्यात कष्ट केले तर यश नक्कीच मिळते पण त्यासोबत माणूस म्हणून चांगले राहणे महत्त्वाचे आहे प्रामाणिकपणा,शिस्त व नम्रता, निघून सदैव जपा असे प्रतिपादन प्रा.सागर बनसोडे सर यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सागर बनसोडे सर यांचा यांचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. विद्यार्थी करण बर्वे, तुषार कर्डिले, कु. माधुरी कोहक, अलसबा शेख, शरयू मचे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.निरोप घेताना या विद्यार्थ्यांना अक्षरशः गहिवरून आले चाइल्ड करिअरच्या शिक्षकांनी आम्हाला खूप छान शिकवले व बहुमूल्य असे मार्गदर्शन केले त्यांचे ऋण आम्ही आम्ही आयुष्यात कधीही विसरणार नाही, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष निकम प्रास्ताविक शाहरुख सय्यद व आभार कैलास तांबे यांनी मानले.

