बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सुषमा आनंद दळवी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली तर निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांनी काम पाहिले. या निवडीसाठी सूचना पोपट विठ्ठल मुंगसे यांनी मांडली तर अनुमोदन राधिका अनिकेत मुथा यांनी दिले.
या ग्रामपंचायत उपसरपंच पदाला रोटेशन पद्धतीने ठरवलेले असून माजी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे यांनी मनाचा मोठेपणा करत स्वतःहून राजीनामा दिला होता. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीसाठी ज्येष्ठ नागरिक बाजीराव पाटील मुंगसे, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कडूभाऊ तांबे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे उपस्थित होते. तर नूतन उपसरपंच सुषमा आनंद दळवी व सदस्याचे स्वागत सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे यांनी केले.
या निवडीसाठी माजी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर खांडे, अभिजीत ससाने, शरद तांबे, अविनाश कदम,अर्जुन कोकरे तर महिला सदस्य माजी उपसरपंच राणी महादेव पुंड, मार्था विश्वास हिवाळे, मीनाक्षी लक्ष्मण मुंगसे,अलका कानिफनाथ गोयकर,उषा गायकवाड उपस्थित होत्या. तर निवडणूक प्रक्रियेत बाळासाहेब म्हस्के, गणेश तांबे, संजय कुटे यांनी कर्तव्य बजावत काम पाहिले.
नूतन उपसरपंच सुषमा दळवी यांचे ग्रामपंचायतच्या व उद्योजक सुभाष शेठ चोपडा, बाळासाहेब चोपडा, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, सतीशशेठ मुथा, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे,विश्वास हिवाळे टेलर,
पत्रकार इंनुस पठाण, कानिफनाथ गोयकर, लक्ष्मण मुंगसे, महादेव पुंड, अनिकेत मुथा,डॅनियल दळवी,आप्पा दळवी, महेश दळवी, प्रदीप मिरपगार च्या वतीने सन्मान करत अभिनंदन करण्यात आले. दळवी परिवारातील सर्वसाधारण वंचित घटकाला उपसरपंच पदाचा बहुमान मिळाल्याबद्दल नेवासा तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
यावेळी नूतन उपसरपंच सुषमा दळवी यांनी सर्वांचे आभार मानत माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र राहत दिलेल्या संधीचे सोने करेन म्हणत सर्वांचे आभार व्यक्त केले.

