बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शोभाताई एकनाथराव भुजबळ यांनी विद्यार्थीनींना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांनी अध्यक्षस्थान भूषवून विद्यार्थिनींनी निर्भय, निडर आणि निर्भीड व्हावे असे आवाहन केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी सानिया शेख हिने सूत्रसंचालन केले, तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अजित हरिश्चंद्रे यांनी केले.
प्राध्यापिका मोनाली गायके यांनी अध्यक्षीय सूचना मांडली तर अध्यक्ष सूचनेस प्रा. शहाबाज सय्यद यांनी अनुमोदन दिले. पाहुण्यांचा परिचय प्रा. दत्ता कोकाटे यांनी केला. प्रा. डॉ. अमोल दहातोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले . कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी , प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवक उपस्थित होते.


