तेलकुडगाव येथील यात्रा महोत्सवात भरणार राष्ट्रीय मल्लांचा जंगी कुस्त्यांचा हगामा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तेलकुडगाव येथील महाशिवरात्रीपासून १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी चार दिवसीय ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी समस्त ग्रामस्थांच्या व यात्रा कमिटी च्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. यात्रोत्सवाची रूपरेखा : रविवार दि. १५/०२/२०२६ सकाळी महाशिवरात्री निमित्त हभप गणेशजी महाराज कुदळे यांची किर्तनसेवा होईल व तद्नंतर महाफराळ पंगत जनार्दन गटकळ, अरुण पा घाडगे मा.चेअरमन, किशोर काळे सर, चि.प्रणव नवनाथ गटकळ, भिमराज घोडेचोर, भाऊसाहेब काळे, अशोक घाडगे यांच्यावतीने होईल. सोमवार दि.१६/०२/२०२६ रोजी दुपारी ४.०० वा कावडी प्रस्थान तीन कावडीला बक्षिस दिले जाईल.यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार दि. १७/०२/२०२६ रोजी सकाळी भव्यदिव्य कावडी मिरवणूक, चैतन्य नागनाथ महाराज मुर्तीस गंगाजलस्नान संपन्न होईल व रात्री छबीना मिरवणुक, शोभेच्या दारूची आतीषबाजी व रात्री राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर लोकनाट्य तमाशा होईल, नंतर रात्री देवाचा जागर होईल. बुधवारी १८/०२/२०२६ सकाळी ८:३० वा. हजेरीचा कार्यक्रम व दुपारी भव्यदिव्य निकाली जंगी कुस्त्यांचा हगामा होईल.
यावर्षीचे यात्रेचे विशेष मुख्य आकर्षण असणार आहे ते म्हणजे, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ नंतर भव्य दिव्य अशा राष्ट्रीय महिलांच्या कुस्त्याचा जंगी कुस्त्यांचा हगामा होत आहे.  दुपारी २ ते ७ समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्याने श्री चैतन्य नागनाथ क्रिडा संकुल श्रीरामनगर येथे नामांकित मल्लांच्या, कुस्त्यांचा जंगी हगामा होईल. यावर्षी यजमानांच्या व गावकऱ्यांच्या आर्थिक सहकार्यातून जवळपास तीन ते चार लाख रुपयांपर्यंत नियोजित गावकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील, अशा राष्ट्रीय पंचकमिटीच्या माध्यमातून नामांकित मल्लांच्या निकाली कुस्त्या लावण्यात आलेल्या आहेत. ऐनवेळी येणारे पहिलवान यांची नावनोंदणी हंगामाच्या सुरवातीला १ ते २ या वेळेत होईल.
या जंगी कुस्त्यांच्या आखाड्यात कुस्तीसाठी ज्यांनी आर्थिक स्वरूपात अनमोल असे मदत केली आहे ती पुढील प्रमाणे  १). त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा शिक्षण महर्षी मेजर साहेबरावजी घाडगे पाटील यांची कुस्ती मैदान विषयीची आस्था होती ती पुढे चालू ठेवत अध्यक्षा Ad. सुमतीताई साहेबराव घाडगे पाटील यांच्या वतीने ५१ हजार रुपये 2). वैकुंठवासी जगन्नाथ केशव काळे भाऊ यांच्या स्मरणार्थ तेलकुडगाव येथील प्रगतशील शेतकरी  सरपंच रेवन्नाथ जगन्नाथ काळे व प्रगतशील शेतकरी श्री आबासाहेब जगन्नाथ काळे यांच्या वतीने ४१,०००/. ३) श्री सतिशराव सर्जेराव काळे सरपंच, तेलकुडगाव यांनी आपले पिताश्री श्री सर्जेराव गोपाळराव काळे शुभहस्ते ३१०००/- रुपये, ४) शरदराव उत्तम काळे उपसरपंच २१०००/. ५) वैकुंठवासी भाऊराव देवराव काळे यांच्या स्मरणार्थ औदुंबर कलेक्शनचे मालक भारत भाऊराव काळे मा. उपसरपंच यांच्या वतीने १११११/- ६) स्वर्गीय सुखदेव यादव गटकळ यांच्या स्मरणार्थ प्रगतशील शेतकरी बाळासाहेब सुखदेव गटकळ सर, व श्री राजेंद्र सुखदेव गटकळ, यांच्या वतीने ११०००/- ७) श्री सुरेश कारभारी काळे साहेब मा.सरपंच व प्रगतशील शेतकरी शंकर मारुती घोडेचोर यांच्या वतीने १०,०००/- ८) काकासाहेब बाजीराव काळे मा. चेअरमन यांच्या वतीने १००००/- ९). स्वर्गीय गोविंद पाटीलबा काळे व स्व. सुभद्राबाई गोविंद काळे यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर भाऊसाहेब काळे मा. चेअरमन यांच्यावतीने  ७०००/- १०).  डॉक्टर कमलेश महादेव काळे (MBBS एमबीबीएस पूर्ण.) आणि महादेव ज्ञानदेव काळे नागनाथ दुधसंकलन यांच्या वतीने ७०००/- ११). स्वर्गीय रामभाऊ सूर्यभान काळे यांच्या स्मरणार्थ महेशराजे चंद्रकांत काळे यांच्या वतीने ६०००/- १२) त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा शिक्षण महर्षी मेजर साहेबरावजी घाडगे पाटील यांच्या प्रित्यर्थ अध्यक्षा डॉक्टर सुमतीताई साहेबराव घाडगे  यांच्यावतीने ६०००/-  १३) स्वर्गीय रामभाऊ सूर्यभान काळे यांच्या स्मरणार्थ बाबासाहेब श्रीपती घोडेचोर यांच्यावतीने ५०००/- १४). स्वर्गीय रेवन्नाथ विश्वनाथ काळे यांच्या स्मरणार्थ तात्यासाहेब रेवन्नाथ काळे व बालकनाथ रेवन्नाथ काळे मा. सरपंच यांच्यावतीने ५०००/- १५). स्वर्गीय लक्ष्मण भानुदास साळुंके यांच्या स्मरणार्थ रावसाहेब लक्ष्मण साळुंके व बाबासाहेब लक्ष्मण साळुंके यांच्या वतीने ५०००/- १६) विकास बळवंत काळे सर व बाळासाहेब कचरू काळे सर मा. चेअरमन यांच्या वतीने ५०००/-  १७) कै. भानुदास पंढरीनाथ म्हस्के यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत भानुदास म्हस्के चेअरमन यांच्या वतीने ५०००/-
या लाल मातीतल्या खेळाची आवड व उत्साह कुस्तीप्रेमी असणारे शिक्षण महर्षी मेजर साहेबरावजी घाडगे पाटील साहेब यांचा उत्साह पुढेही सुरू ठेवत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुमतीताई साहेबराव घाडगे पाटील, उपाध्यक्षा स्नेहलताई घाडगे/चव्हाण पाटील, आणि डॉक्टर श्रुतीताई घाडगे/आमले पाटील यांच्या वतीने नामांकित मुलींच्या सर्व कुस्त्या त्यामध्ये  १) पहिली नामांकित कुस्ती ११०००/. २) नंबरची कुस्ती ७०००/. ३) नंबरची ६०००/. ४). ५५०१/, ५). नंबरची कुस्ती ५१००/. ६). नंबरची कुस्ती ५००१/. या सर्व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आल्या.
तेलकुडगावच्या कुस्त्यांचा आखाड्यामध्ये वरील सर्व यजमान मंडळींनी विशेष आर्थिक स्वरूपात योगदान दिले. या भव्य दिव्य नामांकित निकाली कुस्त्यांच्या आखाड्यासाठी कुस्त्या जोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पंच पै.संभाजी निकाळजे सर मो. ९९७०९८२२१३,  पै.संदिप कर्डीले, पै.महादेव काकडे, सर्व शिक्षक वृंद, पंच कमिटी, यात्रा कमिटी यांनी विशेष दखल घेऊन सर्व नामांकित मल्लांच्या कुस्त्या जोडलेल्या आहेत. या आपल्या जंगी कुस्त्यांच्या आखाड्यासाठी प्रसिद्ध कुस्ती निवेदक: प्रमोद माळी सर (बार्शी, सोलापूर) हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व गावकरी, मिठाई दुकानदार, स्टेशनरी दुकानदार, कसरतकार, कलाकार यांनी यात्रा प्रसंगी आप-आपली हजेरी लावून यात्रोत्सवाची शोभा वाढवावी. असे आवाहन चैतन्य नागनाथ महाराज यात्रा महोत्सव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वागतोत्सुक :: चैतन्य नागनाथ महाराज यात्रा महोत्सव यात्रा कमिटी, चै.नागनाथ देवस्थान, समस्त ग्रामस्थ तेलकुडगांव.

संपर्क :: ९९७५७६७७२४, ८३२९१८६०८१, ९९२२६६३५३१, ९०११३२७५००, ९३२५०७२९०४.