बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुटे वस्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बन्सी कुटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण तांबे उपस्थित होते. प्रथमतः अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व माता भगिनींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सुनील गायकवाड सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही प्रसंग, शिवाजी महाराजांनी प्रत्येक कार्य नियोजन करून केले, तेव्हा महाराजांनी प्रत्येक कार्यात यश मिळविले, हे विद्यार्थी व उपस्थितांना आपल्या मनोगतामधून सांगितले. लक्ष्मण तांबे यांनी आपल्या मनोगतामधून आपण समाजाचे देणे लागतो. म्हणून चांगले कार्य केले पाहिजे तसेच प्रत्येकाने आपल्याला शक्य होईल तेव्हढे शाळेसाठी व देवासाठी केले पाहिजे. शाळा म्हणजे जिवंत मंदिर आहे, असे विचार व्यक्त केले.
यावेळी लक्ष्मण तांबे यांनी कुटे वस्ती येथील शाळेसाठी दोन हजार रुपयांची पुस्तके भेट म्हणून दिली. तसेच कविता हिवाळे यांनी मनोगतामधून शाळेतील विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होत असल्याबद्दल शाळेतील दोन्ही शिक्षकांचे आभार व कौतुक केले. आजच्या शिवजयंतीचे मुख्य आकर्षण म्हणजे जयंती निमित्ताने शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गीतावर विद्यार्थ्यांनी सुंदर असे लेझीम नृत्य करून उपस्थितांची वाहवा मिळविली. गायकवाड मॅडम यांनी सुंदर असे फलक लेखन व आकर्षक रांगोळी काढली.
कार्यक्रमासाठी जयहरी कुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास काकडे, शिक्षणतज्ञ चेअरमन ज्ञानदेव कदम, सदस्य अर्जुन घोडके, प्रमुख पाहुणे लक्ष्मण तांबे, भानुदास कुटे, बन्सी खांडे, चांगदेव कुटे, बाबासाहेब काकडे, भाऊसाहेब कदम, महेश खांडे, विठ्ठल कुटे, संतोष कोकरे, बबलू कुटे, पप्पू कुटे, अंकुश कुटे, शयाम घोडके, निकिता काकडे, कविता हिवाळे, सोनाली काकडे, वच्छला कुटे, अर्चना हिवाळे आदी ग्रामस्थ बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गायकवाड मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.


