बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तेलकुडगाव येथील ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सवाचे महाशिवरात्रीपासून १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी असे चार दिवसीय यात्रा महोत्सव अतिशय आनंदात व उत्साहात संपन्न झाला. रविवार दि. १५/०२/२०२६ सकाळी महाशिवरात्री निमित्त हभप गणेशजी महाराज कुदळे यांची किर्तनसेवा होऊन श्री जनार्दन गटकळ, श्री अरुण पा घाडगे मा.चेअरमन, श्री किशोर काळे सर, चि.प्रणव नवनाथ गटकळ, श्री.भिमराज घोडेचोर, श्री.भाऊसाहेब काळे, श्री अशोक घाडगे यांच्यावतीने महाफराळ पंगत झाली. सोमवार दि.१६/०२/२०२६ रोजी कावडी प्रस्थान. यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार दि. १७/०२/२०२६ रोजी सकाळी देवाची भव्यदिव्य कावडी मिरवणूक, चैतन्य नागनाथांच्या मुर्तीस गंगाजलस्नान सजावटीच्या कावडीला बक्षीस दिले. रात्री देवाची मानाच्या घोड्यावरुन छबीना मिरवणूक, शोभेच्या दारूची आतीषबाजी व रात्री राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर लोकनाट्य तमाशा संपन्न झाला. नंतर रात्री देवाचा जागर झाला. बुधवारी १८/०२/२०२६ सकाळी ८:३० वा. हजेरीचा कार्यक्रम व दुपारी भव्यदिव्य निकाली जंगी कुस्त्यांचा हगामा संपन्न झाला.
या यात्रेची शोभा वाढविण्यासाठी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुमतीताई साहेबराव घाडगे पाटील, नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील, पंचगंगा उद्योग समूहाचे संस्थापक प्रभाकर शिंदे पाटील काका, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विष्णू फटांगरे साहेब (मंत्रालय), हिंदू धर्म रक्षक ऋषिकेश दादा शेटे, जिल्हा परिषद सदस्या तेजश्रीताई नवले/लंघे पाटील, सिद्धांत सीड्सचे मालक सिद्धांत पाटील नवले, प्रायमस हॉस्पिटलचे डॉक्टर लोखंडे, रामायणाचार्य हभप हनुमंतजी महाराज गवळी आदी मान्यवर उपस्थित राहिले.
आमदार विठ्ठलराव लंघे, पंचकमिटी व गावातील मान्यवरांच्या शुभहस्ते कुस्ती आखाड्याचे नारळ वाढवून समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत हगाम्यांस सुरुवात झाली. चैतन्य नागनाथ क्रीडा संकुलासाठी पुढील काळात सहकार्य करणार असल्याचे भाऊंनी सांगितले.
यावर्षीचे यात्रेचे विशेष मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे नियोजनबध्द झालेला भव्यदिव्य निकाली कुस्ती आखाडा.
१८ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर श्री चैतन्य नागनाथ क्रीडा संकुल श्रीरामनगर येथे नामांकित मल्लांच्या मल्लांच्या कुस्त्याचा जंगी हंगामा व यात्रा महोत्सवासाठी समस्त ग्रामस्थ, यजमानांच्या व गावकऱ्यांच्या आर्थिक सहकार्यातून जवळपास चार ते पाच लाख रुपयांपर्यंत गावकऱ्यांच्या पंचक्रोशीतील नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील, अशा पंचकमिटीच्या माध्यमातून नामांकित मल्लांच्या निकाली कुस्त्या लावण्यात आल्या.
जंगी कुस्त्यांच्या आखाड्यात कुस्तीसाठी ज्यांनी आर्थिक स्वरूपात अनमोल असे मदत केली आहे ती पुढील प्रमाणे १). त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा कुस्तीप्रेमी शिक्षण महर्षी मेजर साहेबरावजी घाडगे पाटील यांची कुस्ती मैदान विषयीचे प्रेम आस्था या मातीतल्या खेळाची आवड व उत्साह होता असे शिक्षण महर्षी मेजर साहेबरावजी घाडगे पाटील साहेब यांचा उत्साह पुढेही सुरू ठेवत, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुमतीताई साहेबराव घाडगे पाटील, उपाध्यक्षा स्नेहलताई घाडगे/चव्हाण पाटील, आणि डॉक्टर श्रुतीताई घाडगे/आमले पाटील यांच्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या वतीने या आखाड्याची शेवटची व पहिली कुस्ती ५१ हजार रुपये, १२. नंबरची कुस्ती ६०००/, व मुलींच्या ६ कुस्त्या ३९६०० अशा एकुण ९६६००/. रुपये विशेष योगदान दिले. पंचगंगा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री प्रभाकर शिंदे पाटील काका पंचगंगा कारखाना पंचगंगा सीड्स चे मालक काकांनी चैतन्य नागनाथ महाराजांचे दर्शन घेऊन देवाच्या श्रद्धेपोटी भव्यदिव्य अशा नियोजनबद्ध असलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यासाठी ७१०००/. हजार रुपये असे विशेष सहकार्य केले.
2). वैकुंठवासी जगन्नाथ केशव काळे भाऊ यांच्या स्मरणार्थ तेलकुडगाव येथील प्रगतशील शेतकरी सरपंच रेवन्नाथ जगन्नाथ काळे व प्रगतशील शेतकरी आबासाहेब जगन्नाथ काळे यांच्या वतीने ४१,०००/- ३) सतिशराव सर्जेराव काळे सरपंच तेलकुडगाव यांनी आपले पिताश्री श्री सर्जेराव गोपाळराव काळे शुभहस्ते ३१०००/- रुपये, ४) शरदराव उत्तम काळे उपसरपंच २१०००/. ५) वैकुंठवासी भाऊराव देवराव काळे यांच्या स्मरणार्थ औदुंबर कलेक्शनचे मालक भारत भाऊराव काळे मा. उपसरपंच यांच्या वतीने १११११/-
६) स्वर्गीय सुखदेव यादव गटकळ यांच्या स्मरणार्थ प्रगतशील शेतकरी बाळासाहेब सुखदेव गटकळ सर, व श्री राजेंद्र सुखदेव गटकळ, यांच्या वतीने ११०००/- ७) सुरेश कारभारी काळे साहेब मा.सरपंच व प्रगतशील शेतकरी शंकर मारुती घोडेचोर यांच्या वतीने १०,०००/- ८) काकासाहेब बाजीराव काळे मा. चेअरमन यांच्या वतीने १००००/- ९). स्वर्गीय गोविंद पाटीलबा काळे व स्व. सुभद्राबाई गोविंद काळे यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर भाऊसाहेब काळे मा. चेअरमन यांच्यावतीने ७०००/- १०). डॉक्टर कमलेश महादेव काळे (MBBS एमबीबीएस पूर्ण.) आणि महादेव ज्ञानदेव काळे दुधसंकलन यांच्या वतीने ७०००/- ११). स्वर्गीय रामभाऊ सूर्यभान काळे यांच्या स्मरणार्थ महेशराजे चंद्रकांत काळे यांच्या वतीने ६०००/-१२) त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान वतीने ६०००/- रुपये, १३) स्वर्गीय रामभाऊ सूर्यभान काळे यांच्या स्मरणार्थ बाबासाहेब श्रीपती घोडेचोर यांच्यावतीने ५०००/- १४). स्वर्गीय रेवन्नाथ विश्वनाथ काळे यांच्या स्मरणार्थ तात्यासाहेब रेवन्नाथ काळे व बालकनाथ रेवन्नाथ काळे मा. सरपंच यांच्यावतीने ५०००/- १५). स्वर्गीय लक्ष्मण भानुदास साळुंके यांच्या स्मरणार्थ रावसाहेब लक्ष्मण साळुंके व बाबासाहेब लक्ष्मण साळुंके यांच्या वतीने ५०००/- १६) विकास बळवंत काळे सर व बाळासाहेब कचरू काळे सर मा. चेअरमन यांच्या वतीने ५०००/- १७) कै.भानुदास पंढरीनाथ म्हस्के यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत भानुदास म्हस्के चेअरमन यांच्या वतीने ५०००/- अशा जोडलेल्या व ऐनवेळी आलेल्या पहिलवानांच्या कुस्त्या संपन्न झाल्या. या जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.
या यात्रा महोत्सव व आखाड्यासाठी प्राचार्य सोपानराव काळे सर, राष्ट्रीय पंच संभाजी निकाळजे सर, पोपट काळे सर, बापू गटकळ सर, विकास काळे सर, बाळासाहेब काळे सर, सतिशराव काळे पाटील सरपंच, आबासाहेब घाडगे सर, शरदराव काळे उपसरपंच, काकासाहेब काळे मा.चेअरमन, अरुण घाडगे मा.चेअरमन,
शंकर घोडेचोर, बालकनाथ काळे मा.सरपंच, चंद्रकांत म्हस्के चेअरमन, ज्ञानेश्वर काळे मा.चेअरमन, नारायण काळे, बाबुराव काळे, अशोक काळे मा.उपसरपंच, सुरेश काळे साहेब मा.सरपंच, कानिफनाथ घोडेचोर मा.उपसरपंच. संजय घोडेचोर, सचिव अर्जुन गटकळ, अध्यक्ष हनुमंत गटकळ, साईनाथराव काळे, बाळासाहेब माने, रेवन्नाथ पाटील काळे मा सरपंच, नामदेव घोडेचोर ग्रा.सदस्य, शिवाजी घोडेचोर माजी पोलीस पाटील, हरिश्चंद्र गटकळ, सचिन घोडेचोर, रुपचंद गटकळ, प्रसाद घोडेचोर, रविंद्र काळे, संभाजी घोडेचोर, रमेश काळे, संपत घाडगे, सोपान गटकळ, दत्तूराजे काळे, कचरु गायकवाड, पृथ्वीराज गटकळ, संपत घाडगे, दत्तुराजे काळे, मुरलिधर काळे, संजय काळे, रघुनाथ काळे, मोहन काळे, पोपट सरोदे वंचित आघाडी, म्हतारदेव काळे मा. व्हा.चेअरमन, राजेंद्र घाडगे, राजेंद्र तेलधुणे, सोपान शेंडगे, प्रसिद्ध कुस्ती निवेदक: प्रमोद माळी सर (बार्शी, सोलापूर), पै.संदिप कर्डिले, काकडे सर, सर्व पत्रकार बांधव, समस्त ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक आदि मान्यवर मंडळी उपस्थित होते. या यात्रा उत्सवाच्या यशस्वीतेसाठी चैतन्य नागनाथ महाराज यात्रा महोत्सव तेलकुडगाव यात्रा कमिटी, चैतन्य नागनाथ देवस्थान, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ तेलकुडगाव यांनी विशेष परिश्रम घेतले.


