भाऊसाहेब सावंत सर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील आदर्श शिक्षक भाऊसाहेब कचरू सावंत हे आपल्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ शुक्रवार (दि.१३) रोजी सकाळी १०:३० वाजता बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सावंत सर यांचा संत-महंत, मान्यवर व विविध संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे असणार आहेत. तर वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के (श्री संत ज्ञानेश्वर संस्थान नेवासा), गाथामूर्ती हभप सुखदेव महाराज मुंगसे, रामायणाचार्य हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी सभापती काशिनाथ नवले, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, माणिकराव होंडे, गोरक्षनाथ विटनोर, विजय देशपांडे, गटशिक्षणाधिकारी पाथर्डी शिवाजीराव कराड, माजी चेअरमन शिक्षक बँक रामेश्वर चोपडे, गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर, केंद्रप्रमुख कमल लाटे मॅडम, मुख्याध्यापक सतीशकुमार भोसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक व शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देडगाव, माजी विद्यार्थी संघ देडगाव, शाळा व्यवस्थापन समिती केंद्र शाळा देडगाव, विविध कार्यकारी सेवा सोसायटी देडगाव, ग्रामपंचायत देडगाव, बालाजी देवस्थान ट्रस्ट, अहिल्याबाई होळकर विद्यालय देडगाव, सर्व माजी विद्यार्थी यांनी केले आहे.