गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री यांची संत रोहिदास महाराज मंदिरात सदिच्छा भेट

आपला जिल्हा

बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)- तारकेश्वर गडाचे महंत गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री यांनी नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास महाराज मंदिरात सदिच्छा भेट दिली. यावेळी देवस्थानचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांची विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी हभप मतकर महाराज, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, भाजपचे आकाश चेडे, संत रोहिदास महाराज देवस्थानचे सदस्य पांडुरंग एडके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.