बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील पावन हनुमान मंदिर देवस्थान येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडत आहे. वै. ह.भ.प. शिवराम महाराज रिंधे, वै.ह.भ.प. गुरुवर्य बन्सी महाराज तांबे (श्री क्षेत्र नेवासा), वै. यादव महाराज म्हस्के, वै. ह.भ.प. रामभाऊ महाराज रिंधे यांच्या कृपाशीर्वादाने, अण्णासाहेब (आबा) म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली व समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांच्या सहकार्याने या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी ३ एप्रिल रोजी भागवताचार्य ह. भ. प. मारुती महाराज झिरपे (चापडगाव) यांच्या किर्तनसेवेला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अण्णासाहेब (आबा) म्हस्के, बाबासाहेब म्हस्के (इंजिनियर), चंद्रभान ताके, बाळासाहेब रिंधे, शिवाजी रिंधे, दिलीपराव ताके, पत्रकार अनिल पंडित, संभाजी रिंधे, नामदेव खराडे, तुकाराम ताके, दामोदर रिंधे, साहेबराव काटे, दत्तू ताके, शरद जाधव, महेशभैया उगले, नारायण म्हस्के, गोरख कानडे, अमोल खराडे, पांडुरंग रिंधे, शिवाजी शिंदे, भाऊराव कपिले, बापूराव वाघमारे, शिवाजी अंकल आदी ग्रामस्थ व भजनी मंडळ जेऊर हैबती उपस्थित होते.

