जनशक्ती (वृत्तसेवा)- पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे कै. श्री. रखमाजी घनाजी ननावरे व कै.सौ. लक्ष्मीबाई रखमाजी ननावरे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त जगन्नाथ महाराज गवळी यांची किर्तनसेवा पार पडली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ननावरे परिवाराच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमासाठी संपत रखमाजी ननावरे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, अॅड. शंकर कदम, सौ. कदम, प्रा. बन्सीभाऊ ननावरे, हभप वेताळ महाराज, अरुण वांढेकर, संजय भानुदास ननावरे, अशोक ननावरे, संजय तेलोरे, प्रशांत तेलोरे, बहिरनाथ मुंगसे, मंदा संपत ननावरे, मंदाबाई बन्सीभाऊ एडके, बेबीताई गाडेकर, सुनिता संजय ननावरे, नितीन संपत ननावरे, लक्ष्मीकांत संपत ननावरे, नीता नरेंद्र आगवणे, स्मिता तेलोरे आदी मान्यवर तसेच गावातील भजनी मंडळी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके व पत्रकार सचिन ननावरे यांनी श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त केले. शेवटी संपत ननावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ननावरे परिवाराचे सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
