सागर बनसोडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेस्टा या इंग्रजी शाळा संस्था चालक संघटनेच्या अकराव्या राज्यस्तरीय अधिवेशन कोकणठाण ज्ञानपीठ शिर्डी या ठिकाणी पार पडले. सदर अधिवेशनात मेस्टाच्या वतीने दिला जाणारा 2026 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार हनुमान माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक तसेच चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सागर बनसोडे यांना मेस्टा संघटनेचे संस्थापक राज्य अध्यक्ष डॉ.संजय राव तायडे यांचे सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सागर बनसोडे यांच्या शैक्षणिक कार्याची तसेच शाळेत राबवलेल्या अनेक विद्यार्थी हिताच्या शैक्षणिक उपक्रमाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान केला असल्याची माहिती मेस्टा पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्रा .देविदास गोडसे यांनी दिली. रोख रक्कम,मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरम्यान कोणतेही यश हे एकट्याचे नसते माझ्या कुटुंबाचा पाठिंबा आणि माझ्या सहकाऱ्यांची मेहनत यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. हा पुरस्कार मला भविष्यात अधिक जोमाने आणि निष्ठेने काम करण्याची प्रेरणा देईल असे प्रतिपादन पुरस्कार विजेते सागर बनसोडे यांनी केले. या पुरस्काराबद्दल सागर बनसोडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.