चाइल्ड करियर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होळी व धुलीवंदनाचा जल्लोष

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील नामांकित गुणवत्ता,संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून नावाजलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थी व शिक्षक यांनी अत्यंत उत्साहामध्ये पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेच्या परिसरामध्ये रंगाची उधळण आणि आनंदाची लहरी बघायला मिळाली. शाळेनी यावर्षी पर्यावरण पूरक (eco-friendly) होळी साजरी करण्यावर भर दिला.    कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य रवींद्र गावडे सर यांच्या हस्ते होळी पूजनाने झाली. यावेळी शाळेच्या परिसरातील व समोरच्या रस्त्यावरील जमलेल्या कचऱ्याची आणि पालापाचोळ्याची होळी पेटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली व त्याची होळी पेटवण्यात आली. स्वच्छतेचा संदेश दिला. होळीचा सण आनंद प्रेम,वाईटावर चांगल्या चा विजय होली का दहन या संकल्पने च्या आधारे साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या वाईट सवयी कागदावर लिहून त्याचे दहन होळीत केले.
होळीच्या दहनानंतर  विद्यार्थ्यांनी केमिकल विरहित नैसर्गिक रंगाची रंगाची धुळवड रंग बरसे, बालम पिचकारी, होली खेले रघुवीरा, बद्री की दुल्हनिया, यंदाच्या होळीला, शिमगा आलाय , आला होळीचा सण लय भारी,या हिंदी मराठी नृत्यावर ठेका धरत साजरी केली. संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना होळीच्या शुभेच्छा देत जीवनातील नकारात्मकता नष्ट होत सकारात्मकता येवो, अशी भावना व्यक्त केली.