श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट देडगाव शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कडुभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनातून
देडगाव शाखेत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस श्रीकांत हिवाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. प्रस्ताविकात नवनाथ फुलारी सर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती सांगितली. तसेच खंडू कोकरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमप्रसंगी नितीन हिवाळे, गंगाधर कोकरे, निलेश कोकरे, खंडू कोकरे सर, दत्तात्रय गोरे, अविनाश तांबे, सुधाकर नांगरे, आसाराम जावळे, कोअर टीम मेंबर पोपट जमधडे सर, अक्षय तिडके, योगेश भारती उपस्थित होते. शाखाधिकारी पांडुरंग एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.