बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनातून व संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक, शैक्षणिक,सामाजिक व सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे.
संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपला परिवारातील घटक आहे. याचा विचार करून आपल्या संस्थेतील सभासदांसाठी नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजना चालू केलेली आहे. यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसांना 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच अपघात झाल्यास 5 लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल खर्च देण्यात येतो. या योजनेतून त्या कुटुंबाचा खरा आधार देण्याचे काम संस्था करत असते. श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट देडगाव शाखेचे खातेदार सभासद ज्ञानदेव भाऊराव मुंगसे यांचा काही दिवसांपूर्वी रस्ते अपघात झाला होता.
त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेली होती. आज त्यांना ६६,४१६/- रुपयांचा धनादेश नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने देडगाव शाखेचे खातेदार व मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.या कार्यक्रमप्रसंगी एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर नांदे सर यांनी प्रास्ताविक केले.
नागेबाबा परिवाराचे सक्रिय सदस्य आरोग्य मित्र सुभाष मामा गायकवाड यांनी आरोग्य विषयक सुरक्षा कवच योजना विषयी मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाजीराव पाटील मुंगसे, सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, मार्केट कमिटीचे कडूभाऊ तांबे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुनील मुथ्था, संभाजी काजळे, किशोर तांबे, संजय तांबे, आकाश चेडे, भाऊराव मुंगसे, पाराजी पुंड, विलास मुंगसे, नवनाथ पळसकर, महादेव वांढेकर, अशोक मुंगसे, रामराव कुटे, जनार्धन मुंगसे भास्कर चेडे, अंबादास तांबे, हरिभाऊ बावधनकर, किशोर पुंड, राजाराम तांबे, कचरू तांबे, बाळासाहेब पाठक, गंगाधर तांबे, अरुण मुंगसे, डॉ. पोपट तांबे, अक्षय तिडके, राहुल मुंगसे, नेवासा शाखेचे शाखाधिकारी गणेश वायकर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. शाखाधिकारी पांडुरंग एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

