धक्कादायक! पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पाचे नुकसान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गतरात्री झालेल्या पाऊस आणि प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील राजेंद्र कारभारी चेडे या शेतकऱ्यांचे १८६ गट नंबर मधील एका सौर ऊर्जा प्रकल्पाला (Solar Power Plant) मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत प्रकल्पातील १० सोलर पॅनेल्स हवेत उडून गेले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढलेला असताना, काल रात्री अचानक हवामानात बदल झाला. रात्री ९ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आणि सुसाट वाऱ्यामुळे मुख्य फटका गाव बाहेरील सौर ऊर्जा प्रकल्पाला बसला. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, सोलर पॅनेल्सचे लोखंडी फाउंडेशन उचकटून निघाले आणि अनेक पॅनेल्स शेजारच्या शेतांमध्ये जाऊन पडले. सुदैवाने रात्र असल्याने जीवित हानी टळली.
वादळामुळे जवळपास सोलर पॅनेल्स फुटले असून ते पूर्णपणे निकामी झाले आहेत. प्लांटच्या मुख्य कंट्रोल रूममध्ये पाणी शिरले. यामुळे महागडे इन्व्हर्टर आणि केबल ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट-सर्किट होऊन यंत्रणा कोलमडली.