बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंगसे वस्ती (लाल गेट) शाळेत आज (ता.१५) शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवागताचे स्वागत पुष्प व खाऊ देऊन करण्यात आले. तसेच यावेळी मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी देडगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, शंकर मामा सोनवणे, मोहन मुंगसे, अशोक मुंगसे, भागवत टाके, देविदास मुंगसे यांची उपस्थिती लाभली. यावेळी ज्ञानदेव पेहेरे सर यांनी सुत्रसंचालन केले. तर विकास वाघ सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


