जनशक्ती (वृत्तसेवा)- मुळा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडी आज (दि.७) जाहीर करण्यात आल्या. प्राधिकृत अधिकारी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केलेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. मुळा सहकारी साखर कारखाना पदाधिकारी निवडीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी सलग तिसऱ्या पंचवार्षिकलाही कार्यकर्त्यांना चेअरमन व व्हा. चेअरमनपदाची संधी देऊन नवा पायंडा पाडला आहे.निवडणूक अधिकाऱ्यांनी चेअरमनपदी भाऊसाहेब निवृत्ती मोटे तर व्हा चेअरमनपदी बाळासाहेब दादा पाटील यांच्या निवडी जाहीर केल्या. माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी संचालक मंडळाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करुन त्यांचा सन्मान केला.याप्रसंगी मुळा कारखान्याचे माजी चेअरमन नानासाहेब तुवर, माजी व्हा. चेअरमन कडूबाळ कर्डिले, नवनिर्वाचित चेअरमन भाऊसाहेब मोटे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोलतांना माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, कारखाना सभासदांनी मोठा विश्वास आपल्यावर दाखवलेला आहे.
नूतन संचालक मंडळाने सभासद, शेतकरी यांना केंद्रस्थानी मानून काम करावे. कारखाना ही परिसरासह तालुक्याची कामधेनू आहे. आपण स्वतः लक्ष घालून कारखाना गळीत हंगामाचे नियोजन करणार असल्याचे गडाख यांनी सांगितले व नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. आज आयोजित केलेल्या संचालक मंडळाच्या मिटींगचे औचित्य साधून कारखान्याने मिल रोलरचे पुजन करण्याचा कार्यक्रम माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता. मिल रोलरचे पुजन कारखान्याचे संचालक पांडुरंग श्रीरंग निपुंगे, एकनाथ मारुती जगताप, यांच्या हस्ते रोलरचे विधीवत पुजन करण्यात आले.
याप्रसंगी येत्या हंगामात स्टॉपेजेस होणार नाही आणि जास्तीत जास्त गळीत करण्याच्या दृष्टीने काही अडचण येणार नाही, अशा पध्दतीने मशिनरीची ओव्हर ऑईलींगची कामे वेळेत पुर्ण करा, अशा सूचना माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी ज्ञानेश्वर देवस्थानचे हभप देविदास महाराज म्हस्के, ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, दादासाहेब शेळके, कारभारी जावळे, नंदकुमार पाटील, भाऊसाहेब लांडे, भाऊसाहेब निमसे, प्रभाकर कोलते, कैलास जाधव, बाळासाहेब नवले, अरुण सावंत, राजेंद्र सानप, वसंतराव सोनवणे, मदनराव डोळे, कारभारी डफाळ, बाबुराव चौधरी, बबन दरंदले, संजय जंगले, बाळासाहेब गोरे, बाळासाहेब बनकर, कडूबाळ गायकवाड, सोपान पंडित, रंगनाथ जंगले, रमेश जंगले, आप्पासाहेब निमसे, बाबासाहेब आखाडे, गोरक्षनाथ दरंदले, मुकुंद भोगे, संचालक बाळासाहेब भणगे, त्रिंबक सुकाळकर, शंकरराव कदम
, बाळासाहेब परदेशी, प्रकाश भालके, दिनकर घावटे, लक्ष्मण पांढरे, दत्तात्रय बऱ्हाटे, सोपान विरकर, ज्ञानेश्वर दरंदले, चंद्रकांत टेमक, कमलताई दहिफळे, विमलताई सोनवणे, छायाताई भुसारी आदीसह विविध संस्थाचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कारखान्याचे सचिव रितेश टेमक यांनी सुत्रसंचालन केले. आभार कार्यकारी संचालक शरदराव बेल्हेकर यांनी मानले.
मुळा सहकारी साखर कारखाना पदाधिकारी
निवडीत मा. मंत्री शंकरराव गडाख यांनी सलग तिसऱ्या पंचवार्षिकलाही कार्यकर्त्यांना चेअरमन व व्हा. चेअरमनपदाची संधी देऊन नवा पायंडा पाडला आहे.



