जनशक्ती (वृत्तसेवा)- आबासाहेब काकडे हायस्कूल शेवगाव येथे १९८५ सालाच्या पूर्वी शिकत असलेल्या रिमांड होम मधील विद्यार्थ्यांचा शेवगाव येथील स्नेह मेळावा संपन्न तब्बल ४१ वर्षानंतर आले सवंगडी एकत्र खेळीमळीच्या वातावरणामध्ये झाला स्नेह मेळावा संपन्न यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले
या कार्यक्रमप्रसंगी सत्कारमूर्ती आगळे सर ,अध्यक्षस्थानी विठ्ठल गमे सर, प्रमुख पाहुणे आर.बी. गोरे सर, लव्हाट सर, संजय गुरु , काकडे सर,विक्रम लांडे सर, भगवान आगळे,
सखाहरी कोरडे,भाऊसाहेब बोडके , ज्ञानदेव नजन, विक्रम लांडे, ह.भ.प राम उदागे महाराज, पुंजाजी सोलाट, वाल्मीक कोरडे, प्रकाश घाडगे, इस्माईल शेख, संजय गोसावी, सौ.रीता जाधव, भाऊसाहेब सोलाट, नानासाहेब शिंदे, सय्यद लालाभाई, दत्तात्रय काळे, राजाराम दाते, बाबासाहेब खराडे, गोरख भगत, दत्तात्रय उबाळे, बाबासाहेब जरांगे, कैलास ढाणके, सुखदेव पवार, रंगनाथ घारे, सुरेश साळुंके, आनंदा धनवटे, अशोक दुधाडे, भाऊराव वीर, मधुकर गायकवाड, उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अभिष्टचिंतन सोहळ्याचे मानकरी आगळे सर बोलतांना म्हणाले की कठीण परिस्थितीमध्ये रिमांड होम त्या काळामध्ये मी चालवले त्यामध्ये आबासाहेब काकडे यांनी मोठे सहकार्य मला त्या काळात केले तसेच कठीण परिस्थितीमधून या विद्यार्थ्यांना मी घडवले व कधीही विद्यार्थ्यांनी मला उलट शब्दही उच्चारला नाही आणि त्याचीच पावती म्हणून मला आज या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याच्या रूपाने दिल्याची भावना सत्कारमूर्ती आगळे सर यांनी व्यक्त केली.
ते पुढे बोलताना म्हणाले की आज माझा ७४ वा वाढदिवस १९८५ सालच्या पूर्वी शिकत असलेल्या सर्व रिमांड होमच्या विद्यार्थ्यांनी शेवगाव येथे साजरा केला हा माझा पहिला वाढदिवस त्यांनी साजरा केला नसून हा सलग चार वर्षे ते माझा वाढदिवस साजरा करत आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि असे होतकरू व प्रेमळ विद्यार्थी मी घडवले यामध्ये माझे शिक्षकी जीवन सार्थक झाल्याचे समाधाना असल्याचे सत्कारमूर्ती आगळे सर यांनी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन सखाहरी कोरडे यांनी केले होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव पवार यांनी केले कार्यक्रमाला विशेष सहकार्य ज्ञानदेव नजन यांचे लाभले तसेच सर्व सहकारी यांच्या मदतीने हा स्नेह मेळावा व अभिष्टचिंतन सोहळा उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.


