जनशक्ती (वृत्तसेवा)- मुळा धरणातून उद्यापासून (ता.२१) शेतीसाठी शुक्रवारी आवर्तन सोडण्यात येणार आहे. यंदाच्या पावसाळा ऋतूच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याच्या आवर्तनाची नितांत गरज भासू लागल्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी शेतकऱ्यांची ही मागणी लक्षात घेवून मुळा धरणातून शेत पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमदार लंघे – पाटील यांनी मुळा धरणातून आवर्तन सोडण्यासाठी साकडे घातले असता पालकमंत्री विखे पाटील यांनी तातडीने मुळा धरणातून पाणी सोडण्याचे आदेश मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना दिल्यामुळे शुक्रवारी (दि.२१) रोजी मुळा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांतून पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना शेतकरी वर्गातून धन्यवाद दिले आहेत.

