तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त क्षिरसागर परिवाराच्या हस्ते अभिषेक व आरतीचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिर देवस्थान येथे तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त उद्या (ता.३१) अभिषेक व आरती तसेच शिवलीला ग्रंथाचे पारायण आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी संदेश मधुकर क्षिरसागर व श्रावणी संदेश क्षिरसागर यांच्या शुभहस्ते अभिषेक व आरती होणार आहे. त्यानंतर बालाजी ज्वेलर्स यांच्यावतीने भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महादेव मंदिर देवस्थान, कैलासनाथ मित्र मंडळ व क्षिरसागर परिवार यांनी केले आहे.