बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत गावचे भूमिपुत्र सारा टेक्नॉलॉजीचे सर्वेसर्वा, ॲडव्होकेट व उद्योजक ॲड. अजिज राज्जाकभाई पठाण यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ॲड. अजिजभाई पठाण यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च न करता विद्यार्थ्यांसोबत आनंद साजरा करण्याचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता चौथीचा वर्ग डिजिटल क्लासरूममध्ये रूपांतरित करण्यासाठी १५ हजार रुपयांची देणगी देण्याचे त्यांनी जाहीर केले.
शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा मिळाव्यात, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे ॲड. अजीज पठाण यांचे बंधू पत्रकार युनूस पठाण यांनी सांगितले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी कौतुक केले.
शाळेच्या वतीने ॲड. अजिजभाई पठाण यांचे वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन करून विद्यार्थ्यांसाठी केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
वाढदिवस निमित्ताने सेवानिवृत्त आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, अमोल वाहूरवाघ यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक संभाजी कडू सर यांनी केले तर सहशिक्षक मदन लाड सर,सुवर्णा काळे मॅडम,सुवर्णा जाधव मॅडम, संध्या मुंगसे मॅडम, वैशाली पवार मॅडम आदी शिक्षक यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

