बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुटे वस्ती येथे शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अध्यापनाचा अनुभव घेतला. शिक्षिका झालेल्या विद्यार्थ्यांनी परिपाठापासून ते दिवसभर अध्यापनाच्या तासिका, मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास, इतिहास, कला, कार्यानुभव ते शारीरिक शिक्षणाच्या तासिका .. इयत्तनिहाय नियोजन करून शिक्षक दिन उत्साहात साजरा केला.
शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून स्वरा भगवान कुटे हिने कामकाज पाहिले. तर मराठी विषय श्रावणी शरद पवार हिने उत्कृष्ट घेतला, तर आरोही सुनिल गायकवाड हिने इंग्रजी विषयाचे सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून शैक्षणिक साहित्य व वस्तूचा वापर करून कृतीयुक्त अध्यापन केले. गणित साक्षी यशवंत कोकरे हिने उत्तम घेतले. परिसर अभ्यास व दिवसभर प्रशासन मुख्याध्यापिका स्वरा भगवान कुटे हिने पाहिले. तर कला , कार्यानुभव, व खेळाचे चारही शिक्षिकांनी इयत्तानिहाय नियोजन केले. शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी दिवसभर अध्यापनाचा तसेच प्रशासकीय कामाचा अनुभव घेतला व सायंकाळपर्यंत सर्व शिक्षक थकून गेले.
विद्यार्थ्यांनी दिवसभर कसे थकवले असे मुख्याध्यापिका स्वरा भगवान कुटे हिने तर मुलांना सांभाळणे व अध्यापन करणे खरच कठीण काम आहे असे साक्षी कोकरे व श्रावणी पवार हिने आपल्या मनोगतामधून सांगितले. तर आरोही गायकवाड हिने इंग्रजी विषय शिकवण्याचा आनंद घेतला असे सांगितले. दिवसभर शिक्षक दिन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनिल गायकवाड सर, सीमा गायकवाड मॅडम यांचे व सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षकांना सहकार्य लाभले. शाळेला गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड साहेब , विस्तार अधिकारी भागीनाथ बडे साहेब, केंद्रप्रमुख भास्करजी तांबे साहेब ,केंद्र मुख्याध्यापक कडु सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. या शाळेतील कार्यक्रमाचे बालाजी देडगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

