बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जानापूर (वाघमारे वस्ती- पाचुंदा रोड) येथील संत सेना महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज सच्चीतानंद श्रीपाद बाबा, सदगुरु काटे महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने व गुरुवर्य ह.भ.प. आण्णा महाराज बोरुडे यांच्या अधिपत्याखाली मंगळवारी (ता. ८) संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत कीर्तनभूषण ह.भ.प. भगवान महाराज गडदे (आळंदी देवाची) यांची किर्तनसेवा होणार आहे. कीर्तनानंतर आरती होईल व नंतर अण्णासाहेब रामनाथ वाघमारे यांच्याकडून भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त वाघमारे परिवार, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ समाज बांधव माका – निंबेनांदूर -पाचुंदा यांनी केले आहे.

