देडगाव येथील महादेव मंदिरात गणरायाची प्रतिष्ठापना

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी) : नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिर देवस्थान येथे कैलासनाथ मित्रमंडळ व महादेव मंदिर देवस्थानच्या वतीने भक्तिमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गणरायाच्या आगमनाने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
यावेळी प्रमुख मान्यवर असलेले राजनाथ मुरकुटे व गायत्री राजनाथ मुरकुटे यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, कैलासनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ कदम, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके,सेवा संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे सर, कैलासनाथ मित्रमंडळाचे विठ्ठल क्षिरसागर, अरुण वांढेकर, हरिभाऊ मुंगसे, तांदळे देवा आदी कैलासनाथ मित्रमंडळाच्या सदस्यांसह ग्रामस्थ व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधिवत पूजा-अर्चा व मंत्रोच्चाराच्या वातावरणात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना आली.4013d123-4a81-4bf1-9da8-c6000caf5a63

गणेशोत्सवाच्या काळात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, भाविकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कैलासनाथ मित्रमंडळ व महादेव मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.