बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-आई आणी गाईच्या सेवेत ३३ कोटी देवांचे दर्शन होते, असे प्रतिपादन ह.भ.प. गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली, आळंदी) यांनी केले. तेलकुडगावात येथील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता कदम महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली, यावेळी ते बोलत होते. आज सकाळी ९ ते ११ ह.भ.प. गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली, आळंदी) यांची टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

या सोहळ्याच्या निमित्ताने २० सप्टेंबर २०२६ ते शनिवार दि. २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. कथेचे निरूपण ह.भ.प. भागवताचार्य एकनाथजी महाराज जोशी (सिंधीकाळेगावकर, ता. जि. जालना) यांच्या वाणीतून करण्यात आले.
या धार्मिक सोहळ्यास प.पू. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान), ह.भ.प. वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के (श्री क्षेत्र ज्ञानेश्वर संस्थान, नेवासा) आणि ह.भ.प. महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज (देवगड संस्थान) यांचे आशीर्वाद लाभले.
कीर्तनात कदम महाराज म्हणाले की , दारात गायी असावी. गाईची व आईची सेवा केल्यास ब्रम्हांडात तीर्थ स्थळ करण्याची गरज नाही. यांच्यातच आपल्याला ते तीस कोटी देवाचे दर्शन होईल. किर्तनानंतर सर्व भाविकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला. या सप्ताह हजारोच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.
गावातील विविध मान्यवर, ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागातून हा सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी मच्छिंद्र सुर्यभान म्हस्के, चंद्रकांत भानुदास म्हस्के, बबन सुर्यभान म्हस्के, रायभान मारूती म्हस्के, संभाजी मारूती म्हस्के, राजेंद्र मारूती म्हस्के, गहिनिनाथ रावसाहेब म्हस्के, भाऊसाहेब घमाजी म्हस्के,
आण्णासाहेब घमाजी म्हस्के, आण्णासाहेब नाना म्हस्के, रावसाहेब गणपत म्हस्के, नामदेव नाना म्हस्के, तुळशिराम रामराव काळे, प्रल्हाद कुंडलिक काळे, शिवाजी देवराव काळे, कृष्णा (दादा) दत्तात्रय पा. म्हस्के, विठ्ठल सखाराम पा. गायकवाड, एकनाथ श्रीपती म्हस्के तसेच समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ तेलकुडगाव यांनी विशेष परिश्रम घेतले.

