कै. धोंडीराम देवराव मुंगसे यांचे गुरुवारी प्रथम पुण्यस्मरण

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- येथील कै. धोंडीराम देवराव मुंगसे यांचे गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रथम पुण्यस्मरण आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त देडगाव येथील महादेव मंदिरात सकाळी ९ वाजता वैष्णव सेवा आश्रम, ब्रह्मणपूर येथील ह.भ.प. रामायणाचार्य हनुमंत महाराज यांचे कीर्तन होणार आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत कीर्तनसेवा पार पडणार असून, कै. धोंडीराम मुंगसे यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे.
या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मच्छिंद्र धोंडीराम मुंगसे (मुलगा), भाऊसाहेब धोंडीराम मुंगसे (मुलगा), अर्जुन धोंडीराम मुंगसे (मुलगा), संजय धोंडीराम मुंगसे (मुलगा), राजेंद्र धोंडीराम मुंगसे (मुलगा), हिराबाई विष्णू सोनवणे (मुलगी), भागचंद देवराव मुंगसे (भाऊ), गोरक्ष सोन्याबापू मुंगसे (पुतण्या), शिवाजी नामदेव मुंगसे (पुतण्या) तसेच समस्त मुंगसे परिवार, देडगाव यांनी केले आहे.